शिवसेना अस्वस्थ ? कंगनासाठी राऊतांनी वापरला अपशब्द

05 Sep 2020 19:14:18


kangana_1  H x



मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र थांबतच नाहीये.अशातच संजय राऊत यांची हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना कंगनाबद्दल अपशब्द वापरत कोणालाही तिची वकिली गरज काय असे वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.



सुशांतसिंग राजपूत आत्महत्येवरून लक्ष्य करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार आणि त्यांच्या अधिपत्याखाली काम करणारी मुंबई पोलिस पोलिसांवर कंगनाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आरोप केले. सुशांतसिंग प्रकरणावरून मुंबईतील 'मूव्ही माफिया' आणि 'ड्रग पार्टीज'चा पर्दाफाश करण्यावरून कंगनाला लक्ष केले जात आहे. अशातच कंगना आणि संजय राऊत यांच्यातील ट्विटर युद्ध शिगेला पोहोचले आहे. आज तर संजय राऊत यांनी कंगनावर निशाणा साधत अपशब्द वापरला. यापूर्वीही शिवसेनेने कंगना रनौतला मुंबईत आल्यास थोबाड फोडू अशा शब्दांत धमकी दिली होती.


यावेळी संजय राऊत म्हणाले की, 'कंगनाने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. मुंबई शहराने तिला सर्व काही दिले आहे. कंगनाविरोधात काय करावे, हे केवळ शिवसेनेचे काम नाही, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह संपूर्ण महाराष्ट्राला पाहावे लागेल. याबाबत सरकारने यापूर्वीच निर्णय दिला आहे." याबाबत ठाकरे सरकार संविधानिक कायदे मोडू पाहात आहे का ? प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांची जीभ घसरली. ते म्हणाले, "काय असतो कायदा ? बोलणारी मुलगी कोणत्या कायद्यानुसार बोलत आहे? असे म्हणत असतानाच कंगनाबद्दल अपशब्द वापरत तिची वकिली करायची गरज काय?" असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्या या विधानामुळे कंगनाच्या आरोपांमुळे राज्यातील ठाकरे सरकार अस्वस्थ झाले आहे काय असा सवाल नेटकऱ्यानी केला.
Powered By Sangraha 9.0