‘नमस्ते भारत’ ऑनलाईन प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2020
Total Views |
Gadkari_1  H x


भारतीय बनावटीच्या उत्पादनांना मिळणार जागतिक बाजारपेठ!

मुंबई : भारतीय बनावटीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘नमस्ते भारत’ या पहिल्या ऑनलाईन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० ला होणार आहे. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या मीनल मोहाडीकर यांच्या माध्यमातून व सिंगापूरच्या पौर्णिमा कामत यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पूर्णपणे भारतीय उत्पादनांचे ऑनलाईन पद्धतीचे हे पहिलेच भव्य प्रदर्शन आहे. येत्या २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात हे प्रदर्शन पार पडणार आहे.


‘नमस्ते भारत’ या प्रदर्शनात एक लाखांहून अधिक भारतीय बनावटीच्या उत्पादनांसह एक हजारहून अधिक उद्योजकांचा सहभाग असणार आहे. सुमारे शंभर देशांतील लोक इ-व्हिजिटर स्वरूपात या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. या ऑनलाईन प्रदर्शनात आयुर्वेदिक उत्पादने, ऍपरल फार्म आणि ऍग्रो उत्पादने, भेटवस्तू, स्टेशनरी. खादी, हँडीक्राफ्ट आणि एथनिक क्राफ्ट, स्वयंपाकघरातील उपयोगी वस्तू, पाकीटबंद पदार्थ आणि मसाले, कार्पेट आणि रग, बॅग्स, सजावटीच्या वस्तू, फर्निचर, सेंद्रिय उत्पादने अशा अनेक उत्पादनांचा समावेश असेल. ‘नमस्ते भारत’ प्रदर्शनाचा हा मंच संपूर्ण दिवस सुरु राहणार असून खरेदी-विक्रीसह वेगवेगळ्या वेबिनारचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.


महिला उद्योजकांच्या व लघु उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून ‘आम्ही उद्योगिनी’च्या माध्यमातून गेली सुमारे ३० वर्षे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, शारजा व दुबई येथे प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीने महिला व लघु उद्योजकांचे प्रश्न, शासकीय योजना, उद्योगाचे परवाने याबाबत मार्गदर्शन केले जाते. सिंगापूरच्या पौर्णिमा कामत यादेखील अशाच प्रदर्शनांचे गेली दहा वर्षे नियमित आयोजन करीत आहेत. या ऑनलाईन प्रदर्शनात उत्पादकांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी www.namastebharat.world या संकेतस्थळाला भेट द्यावी.




@@AUTHORINFO_V1@@