कंगना तर फक्त कारण आहे ; नितेश राणेंची टीका

    दिनांक  05-Sep-2020 11:49:01
|

Nitesh Rane_1  
 
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईवरून केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे. तिच्यावर राजकीय तसेच कलाकारांकडूनही टीका होत आहे. अशामध्ये भाजप नेते नितेश राणे यांनी ‘कंगना हे फक्त कारण आहे, मुळात बेबी पेंग्विनला वाचवायचं आहे.’ असे सूचक ट्विट केले आहे. या संपूर्ण वादामध्ये शिवसेना या केसवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असल्यची टीका त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की, “ कंगना रानौत हे फक्त कारण आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या प्रकरणावरुन लक्ष हटवायचे आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. याहून अधिक काही नाही.” अशी टीका करत त्यांनी शिवसेना, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर संजय राऊतसहित अनेक नेत्यांनी तिच्यावर टीका केली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.