गृहखरेदी स्वस्त! स्टँप ड्युटी माफ

    दिनांक  04-Sep-2020 12:33:52
|
Stamp Duty_1  H
 मुंबई : मुंबई एमएमआर पुणे आणि नाशिकमधील विकासकांनी स्टँप ड्युटी ग्राहकांना माफ करून हा बोजा स्वत: उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटानंतर रियल इस्टेट क्षेत्र पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. नरेडको महाराष्ट्रमधील सदस्यांनी एकत्र येत हजारो निवासी प्रकल्पामधील परवडणारी, भव्य निवासी घरे उपलब्ध केली आहेत.
 
मुंबई एमएमआर पुणे आणि नाशिकमधील बहुतांश विकासकांनी स्टँप ड्युटी माफ करून हा बोजा स्वत: उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून गृह खरेदीदारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. राज्य सरकारने नुकतीच रियल इस्टेटला बळकटी देण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या काळात घर घेतल्यास तीन टक्क्यांनी स्टँप ड्युटी माफ आणि १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या काळात घर घेतल्यास स्टँप ड्युटी दोन टक्क्यांनी कमी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. या दिशेने आणखी महत्त्वपूर्ण पाऊल नरेडकोने उचलले आहे. इतरही काही विकासक येत्या काळात या मोहिमेत सामील होतील, असा अंदाज आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.