हनुमान गढीवर शंखनाद : रामभक्तांचा जल्लोष

30 Sep 2020 13:51:48

Hanuman Gadhi_1 &nbs
 
 


अयोध्या : राम मंदिराकडे जाण्यापूर्वी दर्शन घेतल्या जाणाऱ्या हनुमान गढीवर बुधवारी राम भक्तांचा जल्लोष पाहायला मिळाला. हनुमान दर्शनासाठी पहाटेपासूनच दररोज इथे भक्तांची रीघ लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचेही पालन केले जात आहे. मात्र, आज बाबरी खटल्याचा ऐतिहासिक निर्णय आल्यानंतर मंदिरात एकच जल्लोष सुरू झाला.
 
 
 
 
राम मंदिर निर्माण आंदोलनात बाबरीचा वादग्रस्त ढाँचा पाडण्याचा आरोप असलेले सर्व ज्येष्ठ नेते आणि कारसेवकांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गढीवर उपस्थित संत महंत मंडळींनी जल्लोष साजरा केला. शंखनाद झाला. राममानाचा जल्लोष झाला. या खटल्यातून मुक्तता झालेल्या सर्वांचे अभिनंदन गढीवरील महंत राजू दास यांनी केले आहे.




Powered By Sangraha 9.0