अभिनेता सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान

30 Sep 2020 14:53:26

Sonu Sood_1  H
 
मुंबई : कोरोनाच्या महामारीचा भारतात वाढता प्रभाव पाहता भारत सरकारने मार्चमध्ये लॉकडाऊन जारी केले. त्यानंतर अनेक मजूर बेरोजगार झाले. लॉकडाऊनमध्ये अनेक परदेशी भारतीय देशाबाहेरच अडकले तर राज्याराज्यात अनेक मजुरांना स्वतःच्या घरीही जाता आले नव्हते. अशांसाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. मात्र, अभिनेता सोनू सूदने अनेक गरजूंची मदत केली. यानिमित्त युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले.
 
 
कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत केली. सोनू सूदच्या या कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. सोनू सूदने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘हा सन्मान माझ्यासाठी विशेष आहे. यूएनकडून आपल्या कामाची दखल घेणे खूप विशेष आहे.’ असे मत सोनूने व्यक्त केले.
 
 
Powered By Sangraha 9.0