आम्ही षड्यंत्र नाही मंत्र रचतो : साध्वी ऋतंभरा

30 Sep 2020 12:22:29
sadhvi_1  H x W
 
लखनऊ : बाबरी वादग्रस्त ढाँचा प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयापूर्वी साध्वी ऋतंभरा यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रीया दिली आहे. आम्ही कुठलेही अपराधाचे षड्यंत्र रचले नाही आम्ही मंत्र रचतो, त्या म्हणतात. अयोद्धेत आता राम मंदिर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यासाठी कुठलीही किंमत मोजावी लागली तरी काहीच फरक पडत नाही, न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मंजूर असेल. त्यांनी सकाळी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
 
 
६ डिसेंबर १९९२ रोजीची घटना ही कुठल्याही प्रकारचे षड्यंत्र नव्हते. आकस्मित घटना होती. षड्यंत्र रचण्याची पद्धत आहे. आम्ही कुठल्याही संपत्तीवर बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ आस्थेच्या मुद्द्यावर रामललासाठी संघर्ष करण्यात आला होता.
 
 
आम्ही भाग्यशाली
 
साध्वी ऋतंभरा यांनी आम्ही भाग्यशाली आहोत, आम्हाला हा संघर्ष पहायला मिळला, असेही साध्वी ऋतंभरा म्हणाल्या आहेत. अयोध्या में राम मंदिर निर्माणासाठी पाचशे वर्षांचा संघर्ष सुरू होता. शेकडो लोकांनी यासाठी बलिदान दिले आहे. आम्ही भाग्यशाली आहोत. या संघर्षाला विराम लागलेला आम्हाला पहायला मिळाला आहे. श्रीराम जन्मभूमिवर भव्य राम मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0