८८ कोटींचा नफा : 'श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी'चा 'मन की बात'मध्ये उल्लेख

    दिनांक  30-Sep-2020 17:10:42
|
weekly market_1 &nbs
 


आमदार प्रसाद लाड यांनी राबविलेल्या आठवडी बाजाराची मोदींकडून प्रशंसा

 
 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडचा उल्लेख त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात रविवारी केला. सहकारी तत्त्वावर चालणारी आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राबविलेल्या आठवडी बाजाराची ही कंपनी युवा शेतकऱ्यांकडून कृषीमालाच्या विक्रीसाठी स्थापन करण्यात आली आहे. हा कृषिमाल मुंबईच्या विविध भागांमध्ये आठवडी बाजारामध्ये विकला जातो, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत तर मिळतेच पण ग्राहकांनाही किफायतशीर भावात ताजी फळे आणि भाजीपाला उपलब्ध होतो.
 
 
 
पंतप्रधानांनी या युवा शेतकऱ्यांच्या प्रयत्नांची जी तारीफ केली, त्यामुळे कृषिमाल विपणनाची अनोखी अशी पद्धत संपूर्ण जगासमोर आली आहे. ‘मन की बात’ या रविवारी प्रसारित झालेल्या रेडिओ कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राने कृषीउत्पन बाजार समिती कायद्यातून फळे आणि भाजीपाला तीन ते चार वर्षांपूर्वी अनियंत्रित करून देशाला दिशा दिशा दाखवली असे उद्गार काढले.
 
 
 
“ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये बदल झाला आणि त्यांच्या मालाला चांगली किंमत मिळू लागली. श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड ही शेतकर्‍यांच्या युवा मुलांकडून चालवली जाणारी संस्था असून त्यामुळे पुणे आणि मुंबई जवळील सत्तर गावांमधील तब्बल ४५०० शेतकऱ्यांचा शेतमाल शहरांमध्ये थेट विकला जाऊ लागला आहे. त्यामुळे कृषीउत्पन्न बाजार समितीमधील मध्यस्थ आणि अडते यांचा अडसर दूर होऊन शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळाली आहे. दुसरीकडे या युवकांनी आपल्या रोजगाराचा प्रश्नही या कंपनीच्या माध्यमातून सोडवला आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
 
 
 
ही कृषिमाल कंपनी युवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केली असून त्यामाध्यमातून शहरांमध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये शेतकऱ्यांचा माल थेट विक्रीला आणला जातो. मुंबईसारख्या शहरांमध्ये हे आठवडी बाजार भरतात. आठवडी बाजारांची ही संकल्पना देवेंद्र फडणवीस सरकारने राबविली आणि त्यासाठी कृषीउत्पन्न बाजार समिती कायद्यातून भाजीपाला आणि फळांना बाहेर काढले गेले.
 
 
 
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोदी सरकारने नुकत्याच पारित केलेल्या तीन कृषिविषयक विधेयकांना काही राजकीय पक्ष विरोध करत आहेत. मात्र तीन ते चार वर्षांपूर्वी आमच्या सरकारने महाराष्ट्रात भाजीपाला आणि फळे कृषीउत्पन्न बाजार समिती कायद्यातून बाहेर काढूला. तो किती योग्य निर्णय होता, दाखवून दिले आणि आता सिद्धही झाले आहे. आमच्या त्या निर्णयामुळे कृषीउत्पन्न बाजार समित्या बंद झाल्या नाहीत, मात्र शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल थेट शहरांमध्ये आणून विक्री करण्याची सुविधा प्राप्त झाली."
 
 
 
"भाजीपाला आणि फळांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा झाला. आठवडी बाजारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळू लागला. भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी या आठवडी बाजारांची जबाबदारी घेतली आणि केवळ एका वर्षात त्यांच्या अधिपत्याखालील आठवडी बाजारांमधून शेतकऱ्यांना तब्बल ८८ कोटी रुपये नफा झाला. महाराष्ट्रात हे मॉडेल यशस्वी ठरले आहे आणि तेच आता राष्ट्रीय स्तरावर राबविले जात आहे. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.”, असेही ते म्हणाले.
 
 
 
 
आठवडी बाजाराची संकल्पना भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुंबई आणि इतर शहरांमध्ये राबविली. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल थेट शहरांमध्ये आणून विकला जाऊ लागला. लाड म्हणतात, “मला आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड बद्दल गौरवोद्गार काढून हे कार्य जगासमोर आणले. मला मी मुंबई अभियान आणि अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या आठवडी बाजारद्वारे शेतकऱ्यांना आणि शेती उत्पादन कंपन्यांना मदत करता आली याचा आनंद आहे.
 
 
 
 
आठवडी बाजारामुळे शेती मालाला थेट बाजारपेठ तर मिळालीच पण शेतकरी युवकांना विपणन कंपन्यांच्या माध्यमातून रोजगारही प्राप्त झाला. आमच्या प्रयत्नांना माननीय पंतप्रधान मोदीजींची तर प्रशंसा लाभलीच पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मॉडेलबद्दल गेल्या दोन दिवसंत विविध व्यासपीठांवर गौरवोद्गार काढले आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”


 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.