न्यायाचा विजय : चंद्रकांतदादा पाटील

30 Sep 2020 17:38:20
Chandrakant Patil_1 
 




 मुंबई
: न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रीया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या सीबीआय विशेष न्यायालयाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करीत आहे. या खटल्यात न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
 
 
सीबीआय विशेष  न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत मा.पाटील बोलत होते.विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ.कालिदास कोळंबकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी या वेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, अयोध्येतील वादग्रस्त वास्तू बाबत जनतेच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला राग उफाळून आला. त्या वेळच्या काँग्रेस सरकारने लालकृष्ण अडवाणी, डॉ.जोशी, उमा भारती आदी नेत्यांवर खटले दाखल केले. 'वर्षांनुवर्षे हा खटला चालला. आता सर्वोच्च न्यायालयाने या सर्व नेत्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. भारतीय जनता पार्टीने कायमच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला आहे. या निकालाने न्यायाचा विजय झाला', असेही मा.पाटील यांनी नमूद केले.
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0