बाबरी वादग्रस्त ढाँचा निकाल : आजचा दिवस ठरणार ऐतिहासिक

    दिनांक  30-Sep-2020 11:40:47
|
babari_1  H x Wलखनऊ : अयोद्धेत राम मंदिर निर्माणाची तयारी जोरात सुरू झाली आहे. तिथेच आता वादग्रस्त ढाचा पाडण्या प्रकरणी निकाल बुधवारी लागणार आहे. २८ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी वादग्रस्त ढांचा पाडला. यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ४८ जणांवर आरोप ठेवण्यात आला. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३२ आरोपींच्या पुढील कारवाईवर आज निकाल येऊ शकतो. 
पहिल्यांदा एफआयआर 198/92प्रियवदन नाथ शुक्ल यांनी सायंकाळई ५.१५ वेळी वादग्रस्त ढाचा पाडल्या प्रकरणी अज्ञात लोकांविरोधात 395, 397, 332, 337, 338, 295, 297 आणि 153ए मध्ये गुन्हा दाखल झाला होता. दूसरी एफआयआर क्रमांक 198/92 इंचार्ज गंगा प्रसाद तिवारी यांच्यातर्फे अन्य आठ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात भाजपचे तत्कालीन प्रमुख नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, डॉ. मुरली मनोहर जोशी, खासदार बजरंग दल प्रमुख विनय कटियार, तत्कालीन विश्व हिंदू परिषद महासचिव अशोक सिंघल, साध्वी ऋतंभरा, विष्णु हरी दालमिया आणि गिरिराज किशोर यांचा सामावेश होता.
 
 
त्यानंतर जानेवारी 1993 मध्ये 47 अन्य प्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत. ज्यात पत्रकारांना झालेली मारहाण लूटमारी, असे खटले आहेत. 1993 मध्ये हाईकोर्टाच्या आदेशानुसार, विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले. त्यात 197/92 ची सुनावणी झाली. त्यात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, 120बी कलम लावण्यात आले. मूळ एफआयआरमध्ये हे कलम लावण्यात आले नव्हते. ऑक्टोबर 1993 रोजी सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये 198/92 खटला दाखल करून संयुक्त चार्जशीट दाखल केली होती.
 
 
त्या आरोप पत्रात बाळासाहेब ठाकरे, नृत्य गोपाल दास, कल्याण सिंह, चम्पत राय यांच्यासारखी ४८ नावे होती. ही एकूण अडीच हजार पानांची चार्जशीट होती. तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारच्या एका चुकीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी सुनावणी झाली. 1993 मध्ये सीबीआयतर्फे संयुक्त चार्जशीट दाखल झाली त्यावेळी आडवाणींसह अन्य जणांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
 
आडवाणी-उमा भारतींसह पाच जण उपस्थित राहणार नाही
 
वादग्रस्त ढाचा प्रकरणातील लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवसेनेचे खासदार राहिलेले सतीश प्रधान, श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास हे उपस्थित राहणार नाहीत. त्याशिवाय माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह कोर्ट न्यायालयात हजर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती ठिक नसल्याने ते उपस्थित राहणार नाहीत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.