मुंबई : मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी मराठा समाजाचे नेते उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांच्यावर टीका केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर देत “स्वतःच्याच नातवाची लायकी काढणारे शरद पवार हे मराठा समाजाला काय मान देणार?” असा सवाल केला आहे.
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर निलेश राणे यांनी ट्विट केले की, “शरद पवार साहेबांनी असं वक्तव्य करणे म्हणजे आश्चर्याची बाब आहे. पण, जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान काय देणार? या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढे कळले की पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही.” एका पत्रकार परिषदेत “उदयनराजे व संभाजीराजे या दोघांनाही भाजपने राज्यसभेवर पाठवले आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार.” असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.