फडणवीसांनी मांडली पूरग्रस्तांची व्यथा

03 Sep 2020 17:27:10
Devendra Fadanvis_1 
 
 
 
नागपूर : राहायला घरं नाहीत आणि शेती पूर्णत: उद्धवस्त झालेली. संकट मोठे असले तरी तातडीने आणि रोखीने मदत दिली, तर अनेक कुटुंब सावरता येतील. राज्य सरकारने निर्णयशून्यता बाजुला सारत तातडीने मदत करावी, अशा मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांवर एकीकडे आस्मानी आणि दुसरीकडे सोयाबीनच्या बोगस बियाणांचे सुल्तानी संकट आहे, अशा स्थितीत त्वरीत त्यांना मदत व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टोचले कान!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात दौरे करावेत की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, त्यावर आम्ही टीका करणार नाही. मात्र, तळागाळात पोहोचल्यानंतर संवादातील अंतर संपते, अनेक त्रुटी दूर होतात. मदत तत्काळ पोहोचते, त्यामुळे त्यांना पूरग्रस्तांच्या भेटीसाठी यायचे असेल तर त्यांनी जरूर यावे हा त्यांचा सर्वस्वी निर्णय आहे, त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. परंतू घटनास्थळावरील वस्तूस्थिती समजून घेऊन राज्य सरकारने नुकसानभरपाई त्वरित द्यायला हवी, असेही ते म्हणाले.
 

 
संपूर्ण संसार उध्वस्त
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खैरी या पूरग्रस्त भागाला भेट दिली. तिथल्या घरांची झालेली पडझड, उध्वस्त झालेले संसार, याचे चित्र शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पवनी आचगाव या गावाला भेट देऊन फडणवीस यांनी नागरिकांनी मदतीसाठी केलेली निवेदने स्वीकारली. ज्यावेळी सांगली, सातारा आणि कोल्हापूरात पूर आल्या त्यावेळी लागू करण्यात आलेला शासन जीआर पुन्हा लागू करून विदर्भासाठी तातडीने मदत पोहोचवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0