'रणबीर अन् रणवीर का ? आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्स टेस्ट करा'

03 Sep 2020 10:10:41

nileash thackeray AU thac


मुंबई : 
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरु असणाऱ्या चौकशीत ड्रग्स कनेक्शनही उघड झाले. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचा संबंध पुन्हा ऐरणीवर आला आहे. बॉलिवूड स्टार कंगना रनौतने ड्रग्सबाबत उघडपणे बोलताना थेट बॉलिवूडच्या ४ स्टार्सची नावे घेतली होती.यात तिने रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांची ब्लड टेस्ट करावी असे म्हंटले. यावरूनच खासदार निलेश राणे यांनी थेट राज्याचे कॅबिनेट मंत्री व शिवसेनेचे युवा नेते असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या ड्रग्स चाचणी करण्याची मागणी केली.




ट्विट करत ते म्हणाले, केवळ रणवीर अथवा रणबीर कशाला तर आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची चाचणी करावी, कारण बॉलिवूडच्या सर्कलमध्ये आदित्य ठाकरेंचा वावर असतो. असे म्हणत निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोणत्याही फिल्मी कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची रक्तचाचणी बंधनकारक करा, अशी मागणी यापूर्वी कंगनाने केली होती. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज घेतले जाते. पाण्यासारखे ड्रग्ज वाहते, असे कंगना अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित सर्व व्यक्ती, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, संशयितांकडे शेकडो तास चौकशी आणि वैद्यकीय अहवालाच्या फेरतपासणीनंतर त्याने आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) विशेष पथकाने काढला आहे. .
Powered By Sangraha 9.0