नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा सन्मान म्हणून भारत सरकारकडून ‘राजीव गांधी खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कार देण्यात येतो. याहीवर्षी खेलरत्न पुरस्कार हा रोहित शर्मासह ५ भारतीय खेळाडूंना देण्यात आला. तर २७ खेळाडूंचा अर्जुन पुरस्कार देऊन सन्मान करण्यता आला. त्यानंतर, आता भारतीय महिला कुस्तीपटू बबिता फोगाट यांनी ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ हा एका महान खेळाडूच्या नावे देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
भारतीय खेळाडूंना देण्यात येणारा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ हा राजीव गांधींच्या नावाने नाही तर एखाद्या महान भारतीय खेळाडूच्या नावाने देण्यात यावा, अशी मागणी ट्विट करत त्यांनी केलिया आहे. तसेच ‘माझी ही मागणी योग्य आहे की नाही? याबद्दलसुद्धा लोकांकडून मत मागवले आहे. एव्हढेच नव्हे तर देशात क्रिडाविश्वातील सर्वात मोठा पुरस्कार महान खेळाडूंच्या नावाने का देण्यात येत नाही?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटते का? तसेच क्रीडा मंत्रालय यावर काय भूमिका घेते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.