गंभीर रुग्णांवरही आता प्लाझ्मा थेरपी!

    03-Sep-2020
Total Views | 116
plasma therapy_1 &nb


मुंबईत तीन रुग्णांवर यशस्वी उपचार!


मुंबई : कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांवरही आता प्लाझ्मा थेरपी केली जाणार आहे. पालिकेने सुरू केलेल्या या उपचार पद्धतीला यश येत असून आहे. आतापर्यंत तीन गंभीर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी ही माहिती दिली.


कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आता चांगलीच नियंत्रणात आली आहे. २ सप्टेंबरपर्यंत एकूण १ लाख १९ हजार ७०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आता केवळ २०८१३ सक्रिय रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या गाईडलाईननुसार प्लाझ्मा थेरपीदेखील सुरू करण्यात आली आहे. यासाठी पालिकेचे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय प्लाझ्मा थेरपी सेंटर बनवण्यात आले आहे. या प्लाझ्मा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ५२ रुग्णांवर प्लाझा थेरपी करण्यात आली असून संबंधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती डॉ. रमेश भारमल यांनी दिली.


या प्लाझ्मा थेरपीला येणारे यश पाहता ही उपचार पद्धती मोठ्या प्रमाणात वापरली जाणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, या उपचार पद्धतीसाठी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. यासाठी प्लाझ्मा दान करणाऱ्यांना सेंटरवर आणणे, त्यांच्या आवश्यक चाचण्या करणे, प्रवास सुविधाही पालिकेच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.




अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121