कोरोनाबाधितांच्या आकडेवारी महाराष्ट्राने 'या' देशालाही टाकले मागे

03 Sep 2020 17:12:41

maharashtra covid19 cases


मुंबई:
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्यात काल १७ हजार ४३३ नवे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख २५ हजार ७३९वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात ५व्या स्थानी असलेल्या पेरू या देशापेक्षाही महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे.


राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा स्वतंत्र देश असता तर महाराष्ट्रही करोना रुग्णांच्या संख्येत जगात ५ व्या स्थानी असता. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पेरूमध्ये करोनाचे ६ लाख ५२ हजार ३७ रुग्ण आहेत. तर भारतात एकट्या महाराष्ट्रात ही संख्या ८ लाखावर आहे. करोनाबाधितांच्या जागतिक यादीत पहिल्या नंबरवर रशिया असून रशियात १० लाख ५ हजार करोना रुग्ण आहेत.


भारतात एकूण २२ टक्के करोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशात करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासूनच महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी २९२ लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यातील ३४ जण मुंबईतील आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंत करोनाने दगावलेल्यांची संख्या २५ हजार १९५ झाली आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर ३.०५ टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या १४ लाख ०४ हजार २१३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३६ हजार ७८५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत.
Powered By Sangraha 9.0