भारतीय सैन्य सज्ज ; सीमेवरील बंदोबस्त वाढला

03 Sep 2020 11:14:43

India China_1  
 
नवी दिल्ली : दिवसेंदिवस भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव वाढताना दिसत आहे. भारतीय सैन्यदेखील लढाईसाठी सज्ज झाले असून आक्रमक पवित्र अवलंबला आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून व्युहरचना आखली जात आहे. पँगाँग त्सो तलाव भागाच्या दक्षिणेकडील अतीमहत्त्वाच्या पोस्टवर भारताने बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पँगाँग त्सो तलाव परिसरातली स्थिती बदलण्याचा पीएलएचा डाव हाणून पाडल्यावर आता भारताने इथे तैनात वाढवली आहे.
 
 
भारत आणि चीन यांच्यातला तणाव निवळण्यासाठी बुधवारीही तब्बल ८ तास लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, या चर्चेतूनही कोणताही तोडगा निघाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने परिसरातल्या अनेक महत्त्वाच्या शिखरांना ताब्यात घेऊन तिथे भारतीय सैन्य तैनात केले आहेत. पूर्वेकडील लडाखमधील पँगाँग तलावाच्या दक्षिण भागात चीनच्या पीएलएच्या स्थितीत बदल करण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन दिवसानंतर भारतीय लष्कराने मोठ्याप्रमाणात बंदोबस्तात वाढ केली आहे. दोन्ही देशांत लष्करी चर्चा सुरू असतानाही चीन पुन्हा चिथावणीखोर कारवाईत करण्यात गुंतला आहे आणि पीएलएच्या द्विपक्षीय बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे भारताने सांगितले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0