दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या भावाचेही कोरोनामुळे निधन!

    दिनांक  03-Sep-2020 16:48:34
|
Dilip kumar_1  


कोरोनाची लागण झाल्याने श्वास घेण्यास होत होता त्रास!

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २१ ऑगस्ट रोजी सर्वात लहान भाऊ असलम खान यांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर आता त्यांच्या दुसऱ्या भावाचीही प्राणज्योत मालवली आहे. बुधवारी रात्री ९० वर्षीय अहसान खान यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारात लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॉस्पिटलच्या सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना क्रिटिकल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले होते.


दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वाच्छोश्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. १५ ऑगस्ट रोजी दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. २१ ऑगस्ट रोजी असलम खान यांचे निधन झाले होते. ते ८८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वाच्छोश्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.


१५ ऑगस्ट रोजी दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्याने आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे अहसान आणि असलम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असलम आणि अहसान यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सायरा बानो यांनी वृत्त्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. डॉक्टर जलील पारकर आणि हृदय रोग तज्ज्ञ नितीन गोखले त्यांच्यावर उपचार करत असल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.