शिवसेनेने दिला धोका ; कॉंग्रेस नेते संजय निरुपमांची टीका

    दिनांक  03-Sep-2020 12:28:53
|

Sanjay Nirupam_1 &nb
 
मुंबई : ठाकरे सरकारने नॅशनल पार्क तथा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ६०० एकर वनांसाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. एवढ्चे नव्हे तर कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी ‘शिवसेनेने कॉंग्रेसला धोका दिला’, असा आरोपही ट्विटवरून केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि कॉंग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
 
 
 
 
 
“महाराष्ट्र सरकार हे ‘आरे’ जंगलातच कारशेड रचण्याचे षडयंत्र आखत आहे. ६०० एकर जंगल घोषित करून कारशेड वेगळे करण्यात आले. शहरामध्ये जंगल आणि जंगलात कारशेड हा कसला विकास मॉडेल?” असा खोचक प्रश्न काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी विचारला आहे. पुढे ते ‘शिवसेनेने आम्हाला धोका दिला’ असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. याआधीही निरुपम यांनी सरकारवर टिका केलेली आहे, म्हणून यावर काँग्रेसची अधिकृत भूमिका काय येते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.