तपास अंतिम निर्णयाकडे ? एम्सने सीबीआयकडे अहवाल सोपवला

29 Sep 2020 11:24:02

sushsntsingh_1  



मुंबई :
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयाने सीबीआयला अहवाल सोपविला आहे. या अहवालाच्या आधारे याप्रकरणी आता सीबीआय पुढील तपास करणार आहे. तसेच, सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? यावरून सीबीआय निष्कर्ष काढणार आहे. एकीकडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीत अनेक बॉलिवूडचे कलाकार अडकले असण्याची शक्यता असतानाच मुळात ज्यासाठी हा तपास सुरु झाला त्या सुशांतच्या मृत्यूबद्दलचे गूढ अद्याप उकललेलं नाही. त्यामुळे सीबीआय नेमकं काय करतंय यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते.



याप्रकरणी आता एम्सच्या अहवालानंतर सीबीआय अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एम्सने सुशांतचा ऑटोप्सी व व्हिसेराचा तपास अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआय या अहवालाची इतर पुराव्यांशी तुलना करेल. तसेच, या अहवालाच्या आधारे सीबीआय आपला पुढील तपास करणार आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचे राहिले नाही, असा आरोप सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांच्याकडून करण्यात आला आहे.



मात्र, आता आता एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. यानंतर सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरू होईल आणि अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस येतील. यादरम्यान सुशांतसिंग प्रकरणाच्या तपासावरून सीबीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना देखील सीबीआयने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सीबीआयने आपण कसून तपास करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुशांतचा मृत्यू ही हत्या होती, वा आत्महत्या होती यापैकी कोणत्याही एका निकषावर आम्ही अजून आलेलो नाही. कारण अद्याप तपास चालू आहे. आम्ही आमच्या वेगाने तपास करत असून योग्य वेळी आम्ही आमच्याकडे असलेली माहीती देऊ असेही सीबीआयने सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0