मुंबईत दोन लाख कोरोना बाधित, मृत्यूदरही सर्वाधिक

29 Sep 2020 12:08:22
mumbai_1  H x W


मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता दोन लाखांवर पोहोचली आहे. सोमवारी एकूण २ हजार ४४ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबई हे देशातील सर्वाधिक रुग्ण असणारे चौथे शहर / जिल्हा बनला आहे. तसेच इथला मृत्युदरही सर्वाधिक ४.४ टक्के आहे. मुंबईकरांसाठी ही चिंताजनक बाब मानली जात आहे. 
मुंबईत एकूण कोरोना बाधितांची संख्या २,००,९०१ इतकी झाली आहे. तर १,६४,८२२ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. तर एकूण मृत्यूचा आकडा ८ हजार ८३४ इतका झाला आहे. तसेच इतर कारणांमुळे झालेले मृत्यू हे ४०१ इतके आहेत. सध्या २६ हजार ७८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धारावी पॅटर्नचीही चिंता वाढत आहे. दादर-माटुंगा भागातील रुग्णांच्या संख्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 
सर्वाधिक मृत्यूदर मुंबईचा
शहर मृत्यू मृत्यूदर 
मुंबई -  ८,८३४ ४.४ टक्के
पुणे -  ५,६८९ २.० टक्के
दिल्ली - ५,२७२ १.९टक्के
बंगळुरू -  २,८४५ १.३ टक्के
Powered By Sangraha 9.0