नुस्ता पैसा! अंबानी कमावतात तासाला ९० कोटी!

    दिनांक  29-Sep-2020 19:15:00
|
Mukesh Ambani_1 &nbsमुंबई : मुकेश अंबानी गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक तासाला ९० कोटी रुपये कमावत आहेत. तेही कोरोना काळात आर्थिक संकट गडद असताना व्यवहार ठप्प असताना त्यांना ही गोष्ट जमली कशी त्याबद्दल वाचा सविस्तर... हुरुन इंडिया आणि आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड यांच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. मंगळवारी आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट-2020 ची ९ वी एडीशन जाहीर करण्यात आली आहे.  मुकेश अंबानी यांचा त्यात पहिला क्रमांक आहे. 
 
 
३१ ऑगस्ट २०२० पर्यंत एक हजार कोटी रुपयांच्या सर्वाधिक संपत्ती असलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींचा यात सामावेश होतो. यात गेल्या ९ वर्षांपासून मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर कायम आहेत. या अहवालानुसार अंबांनींचे एकूण उत्पन्न ६,६८,४०० कोटी रुपये इतके आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत ७३ टक्के वाढ झाली आहे. २०२०च्या या एडीशनमध्ये ८२८ भारतीयांचा सामावेश आहे.


 
अहवालानुसार, ६३ वर्षीय अंबानी यांनी लॉकडाऊन संदर्भात मार्च ते ऑगस्ट दरम्यान प्रतितासाच्या विचार केला असता ९० कोटी रुपये कमाई होत असल्याचे दिसून येत याहे. मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तर जगातील सर्वात चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत.
 
 
क्रम व्यावसायिक नेटवर्थ (कोटी रुपये) कंपनी
 
१. मुकेश अंबानी ६,५८,४०० रिलायंस इंडस्ट्रीज
 
२. हिंदुजा ब्रदर्स १,४३,७०० हिन्दुजा
 
३. शिव नाडर १,४१,७०० एचसीएल
 
४. गौतम अदानी १,४०,२०० अदानी
 
५. अजीम प्रेमजी १,१४,४०० विप्रो
 
६. सायरस एस. पूनावाला ९१,३०० सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया
 
७. राधाकिशन दमानी ८७,२०० एवेन्यू सुपरमार्ट्स
 
८. उदय कोटक ८७,००० कोटक महिंद्रा बैंक
 
९. दिलीप संघवी ८४,००० सन फार्मा
 
१०.सायरस पालन जी ७६,००० शापुरजी पालन जी
 
१० शापुर पालन जी ७६,०० शापुरजी पालन जी
 
 
 
लंडन स्थित हिंदुजा बंधू आपल्या तिन्ही भावांसह १,४३,७०० कोटी रुपये यांची संपत्ती दुसऱ्या स्थानी आहे. त्यांची एकूण संपत्ती १,४३,७०० कोटी रुपये इतकी आहे. तर १,४१,७०० कोटी संपत्ती सह एचसीएल (HCL) संस्थापक शिव नाडर यांचा सामावेश आहेत. चौथ्या स्थानी गौतम अदानी तर अजीम प्रेमजी यांचा सामावेश आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.