शिवसेनेच्या अमराठी खासदार 'त्या' ट्विटमुळे ट्रोल

28 Sep 2020 18:48:05

priyanka chaturvedi_1&nbs


मुंबई :
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त केलेले ट्विट शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींना महागात पडले आहे. भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहताना चतुर्वेदी यांनी फोटो ट्विट केला. तो फोटो भगतसिंग यांचाच होता. मात्र त्याखाली चंद्रशेखर आझाद यांचे नाव होते. ही चूक लक्षात येताच नेटकऱ्यांनी चतुर्वेदी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चतुर्वेदी यांनी ते ट्विटच डिलीट केले.





शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चतुर्वेदी यांनी आज एक ट्विट केले. 'दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं आजाद ही रहेंगे- चंद्रशेखर आजाद', असे कॅप्शन फोटोखाली लिहिले होते. त्यामुळे फोटो भगतसिंह यांचा, तर श्रद्धांजली चंद्रशेखर आझाद यांना, ही गोष्ट नेटकऱ्यांची लक्षात आली. त्यांनी चतुर्वेदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर ट्विट डिलीट केले.उत्तर प्रदेश सरकारचे माध्यम सल्लागार मृत्यूंजय कुमार यांनी चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीका केली. 'शहीद भगत सिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. पण काही जणांना चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंह यांच्यातील फरक कळत नाही. हे लज्जास्पद आहे,' अशा शब्दांत कुमार यांनी चतुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला. 
Powered By Sangraha 9.0