सांगली सरकारी रुग्णालयात कोरोनाबाधिताची आत्महत्या

28 Sep 2020 17:20:05

Sangli_1  H x W
 
सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच असतानाच खेडेगावातही कोरोनाबाधीतांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे कोरोनाविरोधात जनजागृती सुरु असतानाच दुसरीकडे अद्याप लोकांमधील कोरोनाची भीती मात्र जात नाही आहे. त्यात, सरकारी रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील कोरोनाबाधीतांवर जोनार्या उपचारांवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशामध्ये सोमवारी सांगलीमधील मिरज येथी कोरोना सरकारी रुग्णालयात एका वृद्ध कोरोनाबाधीताने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
 
 
 
५८ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मिरजमधील सरकारी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी धारदार शस्त्राने स्वतःचा गळा कापल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मृताच्या नातेवाईकांनी मात्र याबाबत संशय व्यक्त केला असून, घाईगडबडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी भूमिका घेतली. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, असा आग्रह नातेवाईकांनी धरला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0