व्होडाफोन-आयडीयाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

28 Sep 2020 15:35:54

VI_1  H x W: 0
 



नवी दिल्ली : टेलीकॉम कंपनी व्होडाफोन-आयडीया लिमिटेडतर्फे ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. 3G सेवा वापरणाऱ्यांना 4G सेवेत अपग्रेड करून घेण्यात येणार आहे. यामुळे 3G सेवा वापरणाऱ्यांना 4G सेवेद्वारे हायस्पीड इंटरनेट देण्यात येणार आहे. कंपनीकडे 2G ग्राहकही आहेत, त्या ग्राहकांची सेवा कायम राहणार आहे.
 
 
 
युझरला मिळणार हायस्पीड डेटा
 
कंपनीने रविवारी या प्रकरणी एक माहिती जाहीर केली आहे. व्होडाफोन आपल्या 3G ग्राहकांना 4G आणि 4G बेस्ट आयओटी अॅप्लिकेशन्स आणि सेवा अपग्रेड केली जाणार आहे. 2G ग्राहकांना या संदर्भात अपग्रेडेशनही केले जाऊ शकते. 2G ग्राहकवर्ग हा विशेषतः ग्रामीण भागातील आहे. अपग्रेडेशन प्रक्रीया टप्प्याटप्प्यांनी पूर्ण केली जाणार आहे. जूनच्या अखेरपर्यंत व्होडाफोन आयडीया नेटवर्कवर ११.६ कोटी मोबाईल ब्रॉडबॅण्ड युसर होते. १०.४ कोटी 4G ग्राहक आणि 3G ग्राहक आहेत. 
 
 
ग्राहकांना खिळवून ठेवण्याचे आवाहन
 
व्होडाफोन इंडिया आणि आयडीया या कंपन्यांचे विलिनीकरण झाल्यानंतर नव्या ब्रॅण्ड Vi च्या इंटीग्रेटेड 4G नेटवर्क GIGAnet ला लॉन्च केले आहे. न्यू लॉन्च इंटीग्रेटेड 4जी नेटवर्क GIGAnetद्वारे नव्या ग्राहक जोडणीचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच ग्राहकांचा दुसऱ्या कंपन्यांकडे असलेला ओढा रोखण्याचे काम सुरू आहे. ट्रायच्या एका अहवालानुसार, दोन्ही कंपन्यांचे एकूण ४८.२ लाख इतके युझर्स कमी झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0