हा निव्वळ मूर्खपणा ; ड्रग्स चौकशीवर जावेद अख्तरांची प्रतिक्रिया

26 Sep 2020 13:17:18

Javed Akhtar_1  
 
 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये खळबळ माजली आहे. यामध्ये आता एनसीबीकडून अभिनेत्री दीपिकासह , सारा अली खान , श्रद्धा कपूर , रकूल प्रीत सिंग यांची चौकशी सुरु झाली आहे. मात्र, हा केवळ मूर्खपणा असल्याचे मत प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
“मी १९६५ पासून इंडस्ट्रीत आहे. आजची पिढी जितकी आरोग्याची काळजी घेते तेवढे यापूर्वी कोणीच नव्हते घेत. आजच्या मुला-मुलींना पाहिले तर ते शारीरिकरित्या फिट आहेत. दिवसातले दोन ते तीन तास व्यायाम करत असतात. एकदम स्लीम, फिट, एकही फॅट जास्त नाही. हे तुम्हाला ड्रग्ज व्यसनी वाटत आहेत. जे ड्रग्ज घेतात त्यांना दुरुनही ओळखता येते. ही आजकालची मुले एवढी फिट आहेत की त्यांना ड्रग्जचे व्यसन आहे म्हणणे हा तर निव्वळ मूर्खपणाचे आहे.” असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0