ड्रग्स प्रकरणात धर्मा प्रोडक्शनचा क्षितीज प्रसाद अटकेत

26 Sep 2020 16:49:26

Kshitij Prasad_1 &nb
 
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता अमलीपदार्थ विरोधी पथकाने धर्मा प्रोडक्शनचा दिग्दर्शक क्षितीज प्रसाद याला अटक केली आहे. गेले २ दिवस करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादची चौकशी केली जात होती. या पथकाकडून क्षितिज प्रसादच्या मुंबईतील वर्सोवा, अंधेरी स्थित घरावर छापा सुद्धा मारण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
 
 
क्षितिज प्रसादच्या चौकशीत त्याने मान्य केले आहे की, त्याचे संबंध अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अंकुश अरेंजासोबत होते. क्षितिज प्रसादच्या मुंबईतील व दिल्लीतील घरी असलेल्या पार्ट्यांत अंकुश अरेंजासुद्धा हजर राहायचा. एनसीबीने अंकुश अरेंजालाही अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात काही ड्रग्ज पेडलरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे आपले जबाब दिले. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांची नावे समोर आली आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0