एनसीबीच्या तपासावर संजय राऊतांना प्रश्नचिन्ह

25 Sep 2020 18:57:40

sanjay raut_1  


मुंबई :
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) याप्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण व बॉलिवूडमधील अनेक मोठी नावे ड्रग्ज कनेक्शनमध्ये समोर येत आहेत. मात्र असे असताना या संपूर्ण तपासावरच राज्यसभा सदस्य व शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी ते म्हणाले, एनसीबी ही राष्ट्रीय तपास संस्था आहे. या संस्थेचे काम राष्ट्रीय पातळीवर चालते. परदेशातून आपल्या देशात ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असता. हे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करायचे, त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करायचा, हे खरेतर एनसीबीचे काम आहे. मात्र सध्या एनसीबीच्या कार्यालयात एकेकाला बोलवून चौकशी करण्याचे काम केले जात आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र सीबीआयच्या हाती काहीच लागले नाही त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मार्फत तपास सुरू करण्यात आली आहे. हे सगळे सुरु असतानाच सुशांत आत्महत्या प्रकरणात तपास कुठपर्यंत पोहचला हेसुद्धा कळलं पाहिजे, असे राऊत यांनी पुढे नमूद केले. वास्तविक, एनसीबीच्या तपासातून अनेक मोठे खुलासे आणि बॉलीवूडचे ड्रॅग कनेक्शन समोर येत आहे.


ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. या दरम्यान रियानं रकुलचं नाव घेतलं होतं. रकुल ड्रग्ज घेत असल्याचं रियानं सांगितलं होतं. रकुल आणि रिया दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. मात्र आता अडचणीत येताच त्यांच्याकडून ब्लेमगेम सुरू झाला आहे. रिया ड्रग्ज प्रकरणात भायखळा तुरुंगात आहे. वारंवार प्रयत्न केल्यानंतरही न्यायालयानं तिला जामीन दिलेला नाही.ड्रग्ज प्रकरणात रियाच्या अटकेनंतर आणखी बरीच बॉलिवुडसंबंधित नावे पुढे आली आहेत, परंतु विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त बॉलिवूड अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. याबाबत वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्न या प्रकरणात अद्याप बॉलिवूडच्या अभिनेत्यांची नावे उघड झाली नाहीत, आतापर्यंत केवळ अभिनेत्रींची नावे उघडकीस आली आहेत.
Powered By Sangraha 9.0