काश्मीरी भारतीय नाहीत, चीनने करावे राज्य : अब्दुल्ला

24 Sep 2020 13:28:59
Farukh Abdulla_1 &nb



जम्मू : एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत फारूख अब्दुल्ला यांनी गरळ ओकली आहे. कुठल्याही भारतीयाचा संताप उडेल, असे वक्तव्य अब्दुल्ला यांनी केले आहे. "इमानदारीत सांगतो, मला स्वतःला आश्चर्य वाटेल जर तिथे (काश्मीरात) असा एखादा व्यक्ती सापडला ज्याने स्वतःला भारतीय म्हटले तर." एवढ्यावरच थांबतील ते अब्दुल्ला कसले.
 
 
पुढे ते म्हणतात, "तुम्ही तिथे जा तिथले लोक स्वतःला ना भारतीय मानतात ना पाकिस्तानी. मी हे स्पष्च करू इच्छितो पाच ऑगस्टला गतवर्षी मोदी सरकारने जे काही केले (कलम ३७० हटवले) ते भारतासाठी शेवटची गोष्ट होती. काश्मीरींचा सरकारवर कुठला विश्वास राहिलेला नाही. काश्मीरींनी मोदी सरकारला नव्हे तर गांधींच्या भारताची निवड केली होती."
 
 
"मी जे सांगतो आहे ते लोक ऐकू शकणार नाहीत"
 
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला म्हणतात, "काश्मीरींना वाटते कि चीनने भारतात यावे, चीन मुस्लीमांसोबत काय करतो हे सर्वांना ठाऊक आहे. मी या गोष्टीवर गंभीर आहे, अनेकांना माझे म्हणणे ऐकवणार नाही."
 
 
प्रत्येक गल्लीत एके-४७ सुरक्षारक्षक उभा आहे
 
केंद्रावर निशाणा साधत फारूख अब्दुल्ला यांनी दावा केला की, काश्मीर घाटीतील भारताबद्दल काही लोक बोलतात ते देशाला ऐकवणार नाही. त्यांचे एकून घोणारे कुणीही नाही. तिथे प्रत्येक गल्लीबोळात एक सुरक्षारक्षक उभा आहे. स्वातंत्र्य कुठे आहे." अर्थात सुरक्षारक्षक तिथल्या लोकांचे दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी तिथे उभा आहे, पाकिस्तान्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात लढा देण्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालून तिथे उभा आहे ही बाब अब्दुल्लांसारखा नेता विसरतो. त्यांना देशाचा सैनिक सुरक्षेसाठी उभा असणे म्हणजे पारतंत्र्यात असल्यासारखे वाटते आहे.
 
 
कलम ३७० पुन्हा देण्याची मागणी
 
यापूर्वी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरमध्ये शांतीसाठी कलम ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. पाच ऑगस्ट रोजीच्या दिवशी जे काही झाले ते पुन्हा विचार करण्याची गरज असल्याचे अब्दुल्ला यांनी संसदेत म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0