मुंबई : राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनीही याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ते म्हणाले, "काल मी माझी कोविड-१९ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती."