'अति तेथे माती ; शिवसेनेचा अंत जवळ आलायं'

24 Sep 2020 14:05:38

nilesh rane_1  



मुंबई :
काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर निलेश राणेंनी आज ड्र्ग्स प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले आहे. काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. मराठीमध्ये म्हण आहे 'अति तिथे माती'... शिवसेनेचा अंत जवळ आलाय, अशा शब्दात निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले आहे.



सध्या गाजत असलेल्या ड्रग्स प्रकरणात शिवसेनेच्या एका उपनेत्याचा मुलाची पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. त्या वृत्ताचा आधार घेत निलेश राणेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. ड्र्ग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस अशी आजच्या शिवसेनेची ओळख बनली आहे. मराठीमध्ये म्हण आहे 'अति तिथे माती'... शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.



दरम्यान, नाणार प्रकल्पावरून निलेश राणे शिवसेनेला सातत्यानी टीकेचे लक्ष्य करत आहेत. निलेश राणेंनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते म्हणाले की, नाणार प्रकल्प रद्द झाला आहे असे सांगितले जात असताना मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा का होतेय? ही चर्चा प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी नव्हे तर राजापूर तालुक्यात नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनी आणि शासनातील काही अधिकारी प्लॅनिंग करत आहेत. नाणार पुन्हा राजापूर तालुक्यात आणण्यासाठी हे एकत्र आले आहेत. नाणारमध्ये सुगी डेव्ल्हपर्स म्हणून कंपनी आहे, त्यात निशांत सुभाष देशमुख हे संचालक आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. त्यांनी १४०० एकर जमिनीचा व्यवहार केला आहे. हा व्यवहार ज्यांनी केला ते अँड. कावतकर हे कोदवलीचे आहेत. सगळे व्यवहार एलएलपी म्हणजे लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिपद्वारे झाले, २०१४ ते २०१९ या काळात व्यवहार झाला, असा दावा निलेश राणेंनी केला होता.

Powered By Sangraha 9.0