'मराठा आरक्षणासाठी भाजप कटिबद्ध ; शेवटपर्यंत संघर्ष करू'

24 Sep 2020 15:07:21


maratha reservation_1&nbs

मुंबई
: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाता तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी,"मराठा आरक्षणासाठी भाजप कटिबद्ध आहे,हा विषय तडीस नेईपर्यंत संघर्ष करू" असे आश्वासन त्यांनी आज भेटीस आलेल्या मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.





याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट करत माहिती दिली. यावेळी भातखळकर यांनी महविकासआघाडीवर निशाणा साधला. ते म्हणतात,"मराठा आरक्षणाच्या मुद्याचा नाकर्त्या महाभकास आघाडीने विचका केला. मराठा आरक्षणासाठी भाजपा कटिबद्ध आहे,हा विषय तडीस नेईपर्यंत संघर्ष करू असे आश्वासन आज मी भेटीस आलेल्या मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.स्थगिती उठेपर्यंत समाजाला सवलतींचा लाभ मिळायलाच हवा, असे मी ठणकावून सांगितले," असे ते म्हणाले.


दरम्यान,जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या नऊ गोष्टींची पुर्तता कशी व कधी करणार हे समाजाला ९ ऑक्टोबर पर्यंत पटवून सांगावे, अन्यथा १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला. यापुढे आरक्षणाची लढाई ही एक मराठा लाख मराठा या बॅनर खालीच लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी कोल्हापूरात राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील होते. घटनेप्रमाणे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण 'एसीबीसी' संरक्षित राहावे. ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाची वस्तुस्थिती लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या लक्षात आणून देण्याकरिता चारही प्रमुख पक्षांच्या कार्यालयासमोर 'आक्रोश आंदोलन' करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0