सूरतमधील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये मोठी आग

24 Sep 2020 10:26:38

surat_1  H x W:


सुरत :
गुजरात मधील सूरत येथील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भीषण आग लागली . ही आग गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास लागली असून, आगीवर नियंत्रण मिवळण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.



दरम्यान, आजूबाजूच्या गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ओएनजीसी गॅस प्लॅंट स्फोट इतका भयानक होता की, स्फोटाच्या वेळी घराचे दारे खिडक्या भूकंप झाल्यासारखे हादरत होत्या. सूरतमधील ओएनजीसी प्लँटमध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन ठिकाणी आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्लँटच्या जवळच असलेल्या पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने चित्रीत केला आहे. सुरतमधील ओएनजीसीच्या हाझिरा प्लँटमध्ये पहाटे तीनच्या सुमारास लागोपाठ तीन स्फोट झाले. अशी माहिती सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी दिली. सूरतमधील हाझिरा प्लँटमधील ही आग नियंत्रणात आल्याचे ओएनजीसीकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणीही जखमी झालेले नाही, असेही ओएनजीसीने स्पष्ट केले आहे.

Powered By Sangraha 9.0