'बलात्कार अन् छेड काढणाऱ्या आरोपींना भर चौकात...'

24 Sep 2020 17:07:19

yogi adityanath_1 &n



लखनऊ :
महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्कारासारख्या घटना रोखण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जर यूपीमध्ये कोणत्याही महिलेसोबत जर छेडछाडीचे प्रकार घडले, त्या आरोपीला पकडल्यानंतर त्याचे पोस्टर्स संपूर्ण शहरात झळकावण्यात येणार आहेत. यापूर्वीही योगी सरकारने असे पाऊल उचलले होते.राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या मिशन अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचारी शहरातील चौकाचौकात नजर ठेवतील, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना याबाबतचे आदेश दिले आहेत. महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कडक पाऊलं उचलून दोषींवर कारवाई करावी. त्याचसोबत यात जे गुन्हेगार दोषी आढळतील त्यांचे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



योगी म्हणाले की, महिला आणि मुलींवर बलात्कार, छेडछाड, लैंगिक छळ किंवा शोषण करणार्‍या गुन्हेगार आणि दुष्कर्म करणार्‍यांची नावेही उघड झाली पाहिजेत. असे केल्याने आरोपींना मदत करणाऱ्यांवर दहशत राहील. महिलांवर कोणत्याही प्रकारे अत्याचार करणाऱ्या आरोपींना महिला पोलिसांनी दंड द्यावा. तसेच महिला पोलिसांनी अशा गुन्हेगारांना अद्दल घडवावी.या गुन्हेगारांना मदत करणाऱ्या लोकांचीही नावे जाहीर करावीत. ज्याप्रकारे एन्टी रोमिया स्क्वॉडने छेड काढणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसवला तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याने हे अभियान राबवावे.
Powered By Sangraha 9.0