गुगल मॅपवर समजणार तुमच्या विभागात किती रुग्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2020
Total Views |
Corona tracker_1 &nb
 
 
 
कॅलिफोर्निया : कोरोना महामारीशी लढण्यासाठी गुगल सतत नवनवे प्रयोग करत आहे. अशातच कंपनीने गुगल मॅप द्वारे कोविड लेअर या नव्या फिचरची घोषणा केली आहे. गुगलच्या मते, युझर ज्या विभागातून प्रवास करत आहे तिथे कोरोनाची काय परिस्थिती आहे याची नोंद खघेऊ शकतो. त्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती त्याला मिळू शकते.
 
 
 
दरम्यान, केव्हापासून हे फिचर युझर्ससाठी उपलब्ध होणार या बद्दल अद्याप तारीख सांगण्यात आलेली नाही. गुगलने ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली आह. गुगल मॅप नव्याने अपडेट झाल्यावर अॅण्ड्रोयड आणि अॅपलवर युझर्ससाठी या आठवड्यात याचे अपडेट मिळू शकते. सध्या गुगल मॅप वर वाहतूक व्यवस्था, हॉटेल्स, एटीएम, रुग्णालये आदी गोष्टींची माहिती मिळत असते.  
 
 
कोविड लेअर फिचर कसे करणार काम ?
 
गुगलने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. गुगल मॅपवर युझर जेव्हा अॅप सुरू करेल तेव्हा त्याला लेअर बटणामध्ये COVID -19 info फीचरची माहिती मिळेल. कोरोनाच्या बद्दलची स्थानिक, जिल्हा आणि देशपातळीवरील माहितीही यात साठवलेली असेल. प्रत्येक क्षेत्रात १ लाख लोकांमध्ये सात दिवसांत नव्याने आढळलेल्या किंवा कमी झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीची माहितीही देण्यात येणार आहे.
 
 
कलर कोडींग फिचर
 
गुगल प्रत्येक विभागाला कलर कोडींग फिचर देणार आहे. म्हणजेच कोरोना विभागात जाण्यापासून रोखण्यासाठी ही अॅप मदत करू शकते. ट्रेडिंग मॅप डेटा २२० देशांची माहिती उपलब्ध करून देणार आहे.  मॅपवर उपलब्ध असणाऱ्या प्रत्येकाला राज्य, शहरस्तरातील डेटा यावर मिळू शकतो.
 
 
 
कोण असणार गुगलचे माहिती स्त्रोत

गुगल विविध संस्थांकडून ही माहिती गोळा करणार आहे. कोरोनाबद्दल जॉन्स हॉपकिन्स, न्यूयॉर्क टाईम्स, विकीपीडीया, जागतिक आरोग्य संघटना आणि सरकारी यंत्रणांकडून गुगल ही माहिती मिळवणार आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनासह जगत असताना कोरोनाची माहिती तुमच्या जी-मॅपवर उपलब्ध होणार आहे. सध्या गुगलतर्फे जगभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी विविध स्त्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. त्याप्रमाणेच स्थानिक पातळीवर हा डेटा उपलब्ध होणार असल्यामुळेच याचा फायदा पुढील काळात होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात एकदा अॅप अपडेट केले की हे फिचर तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे. 


दिलासादायक कोरोना रुग्णांची संख्या घटली


देशात गेल्या सहा दिवसांमध्ये कोरोना आकडेवारीत दिलासा देणारी बाब उघडकीस आली आईहे. कोरोना रुग्णांच्या प्रकरणी नवे रुग्ण आढळण्याच्या प्रमाणापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. बुधवारी ८६ हजार ७०३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ८७ हजार ४५८ इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. १७ सप्टेंबर रोजी कोरोनाची आकडेवारी १०.१७ लाख इतकी झाली आहे. त्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सहा दिवसांत ५१ हजार रुग्ण कमी झाले आहेत. १२ सप्टेंबरपासून सर्वात जास्त २४ हजार रुग्णवाढ झाली आहे. देशात आतापर्यंत एकूण ५७ लाख ३० हजार १८४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. ४६ लाख ७१ हजार ८५० लोक ठिक होऊन घरी परतले आहेत. तर ९१ हजार ७१७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ११२३ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाची ही आकडेवारी covid19india.org या वेबसाईटवरून उपलब्ध झाली आहे.


(नवे अॅप अपडेट झाल्यानंतर असे दिसेल गुगल मॅप वर कोरोना कोविड लेअर फिचर )


गुगल मॅप विषयी...
 
वेब मॅपिंगसाठी गुगलद्वारे विकसित केले गेलेले हे एक अॅप्लिकेशन आहे. यात सॅटेलाईट इमेजरी म्हणजेच सॅटेलाईटद्वारे पृथ्वीची जशी आहे तशी प्रतिमा दाखविली जात असते. यात रस्ते, गावं, शहरे, त्याचबरोबर रस्त्यांवरील प्रत्यक्ष वाहतूक, ३६० अंशातील पॅरानोमा व्हू इत्यादी फीचर्स उपलब्ध आहेत.
 
 
लार्स रासमॉसेन आणि जेन्स एलिकस्ट्राक रासमॉसेन या दोन सॉफ्टवेअर डेव्हेलपर्सनी गुगल मॅप विकसित केले. २००४ साली हे अॅप्लिकेशन केवळ डेकस्टॉप वापरासाठी बनविले गेले होते. गुगलने त्याला विकत घेतले आणि नंतर २००५ सालापासून त्यास वेबसाठी विकसित केले गेले. यात प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थापन, आणि पृथक्करणची जोड देऊन फेब्रुवारी २००५ पासून हे सर्वांसाठी खुले केले गेले.
 
 
यात ‘बर्ड-आय’ अथवा ‘टॉप-डाऊन’ व्हू दिलेला असतो. ज्यात उपग्रहाच्या सहाय्याने एरीअल फोटोग्राफी केलेली असते. जवळपास ८०० ते १५०० फुट वरून केलेले हे चित्रीकरण ३ वर्षापेक्षा अधिक जुने नसते. गुगल मॅपमध्ये आज 3D व्हूचा पर्याय देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष चित्रीकरण असल्यामुळे सॅटेलाईट दर्शन देखील करता येते.
 
 
 
अँड्रॉईड आणि आय-फोन साठी २००८ साली गुगल मॅप विकसित केले गेले. २०१३ पर्यंत हे स्मार्टफोनमधील सर्वाधिक प्रसिद्ध अॅप्लिकेशन म्हणून नावारूपाला आले. यात स्मार्टफोनला नेव्हिगेशन सुविधा दिल्यामुळे सामन्यांसाठी याचा वापर करणे अधिक सुविधाजनक बनले त्यामुळे अनेक समस्यांवर तोडगा निघाला. आज ओला, उबर, मेरू इत्यादी सारख्या अनेक स्टार्टअप्स केवळ गुगल मॅपच्या जोरावर कोट्यावधीचा व्यापार करू शकत आहेत.
 



 
 
@@AUTHORINFO_V1@@