रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

    23-Sep-2020
Total Views |
suresh_1  H x W


 
नवी दिल्ली : बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने उपचारांना प्रतिसाद देणे बंद झाले होते.


 
 
अंगडी हे २००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. मराठी आणि कन्नडभाषकांमध्ये समतोल साधणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कर्नाटकात पक्ष मजबूत करण्यासाठी झटणारे सुरेश अंगडी हे प्रभावी खासदार आणि मंत्री होते, असे मोदी यांनी म्हटले आहे.