आयपीएल २०२० हिट ! पहिल्याच सामन्याने मोडला 'हा’ विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2020
Total Views |

IPL 2020_1  H x
 
 
मुंबई : कोरोनाच्या काळामध्ये बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामाचे आयोजन दुबईमध्ये केले. यावेळी स्टेडीयममध्ये एकही प्रेक्षक न घेता, स्टार चॅनल तसेच डिस्नी प्लस हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण करत आहेत. जगभरातून अनेक क्रिकेट चाहते ऑनलाइन हे सामने पाहत आहेत. चेन्नई आणि मुंबईमध्ये झालेल्या पहिल्याच सामन्याने जागतिक विक्रम केला आहे. ‘एकाच वेळेस २० कोटी प्रेक्षक हा सामना पाहत होते.’ अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे
 
.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले आहे की, “आयपीएलच्या पहिल्या सामन्याने नवा विक्रम केला आहे. बार्क (BARC) नुसार, अभूतपूर्व प्रतिसादासोबत २० कोटी लोकांनी सामना पाहिला. कोणत्याही देशातील क्रीडा स्पर्धेला इतक्या प्रमाणात दर्शक मिळालेले नाहीत. कोणत्याही लीगला सुरुवातीलाच इतका मोठा प्रतिसाद मिळालेला नाही.” अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला होता.
@@AUTHORINFO_V1@@