ड्रग्स प्रकरणी दीपिकाच्या मॅनेजरला एनसीबीने पाठवले समन्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2020
Total Views |

Dipika_1  H x W
 
नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये बॉलीवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर आता अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) समन्स बजावण्याचे सत्र सुरु केले आहे. बॉलीवूडमध्ये ड्रग्स आणि अमली पदार्थाचे पसरलेले जाळे आणि नवनवीन खुलासे यामुळे राज्याचे वातावरण तापलेले आहे. अशातच आता अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला एनसीबीने समन्स बजावले आहे.
 
 
 
ड्रग्स प्रकरणी यामध्ये तिच्यावर घेतलेल्या पावलानंतर बॉलीवूडचे मोठे स्टार्स अडचणीत येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये सिनेइंडस्ट्रीमधली ड्रग्सची बाजू समोर आली. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावे समोर आली. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचेही नाव समोर आले आहे. करिश्मासोबतच क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांनासुद्धा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@