'कोकणकन्या', 'जनशताब्दी' पुन्हा सुरू करा ! चाकरमान्यांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2020
Total Views |
CR _1  H x W: 0
 
 
 
 
रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे कोकण रेल्वे प्रवासाला ब्रेक लागला आहे. या मार्गावरील काही सेवा सुरू झाल्या असल्या तरी कोकण कन्या एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस त्वरीत सुरू करून चाकरमान्यांना दिलासा द्यावा, असी मागणी कोकणातील प्रवाशांनी केली आहे.
  
कोकणात जाणाऱ्या काही गाड्या सुरू झाल्या असल्या तरी कोकणवासी प्रवाशांना काही थांबे मिळालेले नाहीत. त्यामुळे अपरिहार्यपणे त्यांना रस्तेमार्गावरून प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि खर्चिक असल्याने ज्या प्रमाणे अन्य गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून सुरू आहेत. त्या प्रमाणे कोकण कन्या एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस या गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
यामुळे प्रवाशांची गैरसोय थांबून स्थानिक रोजगार प्राप्त झाल्यास आर्थिक मरगळ दूर होईल. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या केवळ दिवसाच सुटतात. त्यामुळे पेण, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, वैभववाडी, राजापूर कुडाळ, सावंतवाडी आदी अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या चारही गाड्या त्वरीत सुरू करून दिवसा आणि रात्रीही सोडाव्यात, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुकचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन आणि त्यांचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, कोकण रेल्वेचे अधिकारी आणि स्थानिक खासदार आमदार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@