शरद पवारांना आयकर विभागाचा दणका : बजावली नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2020
Total Views |
Sharad Pawar _1 &nbs
 
 

सुप्रिया सुळेंनाही नोटीस येणार असल्याची चर्चा 


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. यात शरद पवार यांनी २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणूकांमध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. यात नमूद केलेल्या माहिती प्रकरणी आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, याला उत्तर न दिल्यास प्रतिदिन १० हजारांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. (Income tax department Notice issued to NCP Chief Sharad Pawar)
 
 
 
दरम्यान, शरद पवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणी भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे यांनाही नोटीस येणार होती, असे समजते. निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत मागवलेले स्पष्टीकरण म्हणजे आपल्याबाबत प्रेम असल्याने आनंद असल्याची खोचक प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.
 
 
 
नोटीस पहिली मला आली आहे. सुप्रियालाही येणार आहे असे कळले, चांगली गोष्ट आहे. सुप्रियाला काल सायंकाळी नोटीस येणार होती, असे समजले होते. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे.मला काल नोटीस आली आहे, काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून ही नोटीस मला आली आहे. त्याचे उत्तर लवकरच मी देईन, कारण उत्तर दिले नाही तर दिवसाला १० हजार दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@