कुबूल हैं, कुबूल हैं, कुबूल हैं।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2020   
Total Views |


Imran Khan_1  H


पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे ‘इलेक्टेड’ नाही, तर ‘सिलेक्टेड’ पंतप्रधान असल्याचा आरोप पाकिस्तानातील सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकांच्या निकालानंतर केला होता. पण, इमरान खान यांच्यावर दोषारोपण करताना या विरोधी पक्षांनी आजवर पाकिस्तानी लष्करावर थेट निशाणा साधला नव्हता. इमरान खान यांचा ‘पीटीआय’ हा पक्ष मतदानातील आकड्यांचे घोटाळे करुन सत्तेवर आला, याच्याही सुरस कथा पाकिस्तानात सांगितल्या गेल्या. पण, यामागे प्रत्यक्ष लष्कराचाच हात आणि आशीर्वाद असल्याचा सूर सर्वपक्षीय बैठकीत आळवला गेला अन् पाकिस्तानमध्येही एकच खळबळ उडाली.


 
अखेरीस मनातले सत्य ओठांवर आलेच. होय, पाकिस्तान ही नामधारी लोकशाही असून सगळी सूत्रे ही लष्कराच्याच हाती एकवटली असल्याची कबुली ही खुद्द पाकिस्तानातीलच विरोधी पक्षांनी नुकत्याच पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली. त्यामुळे पाकिस्तानातील अलिखित, अकथित सत्य जगासमोर आले. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे ‘इलेक्टेड’ नाही, तर ‘सिलेक्टेड’ पंतप्रधान असल्याचा आरोप पाकिस्तानातील सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकांच्या निकालानंतर केला होता. पण, इमरान खान यांच्यावर दोषारोपण करताना या विरोधी पक्षांनी आजवर पाकिस्तानी लष्करावर थेट निशाणा साधला नव्हता. इमरान खान यांचा ‘पीटीआय’ हा पक्ष मतदानातील आकड्यांचे घोटाळे करुन सत्तेवर आला, याच्याही सुरस कथा पाकिस्तानात सांगितल्या गेल्या. पण, यामागे प्रत्यक्ष लष्कराचाच हात आणि आशीर्वाद असल्याचा सूर सर्वपक्षीय बैठकीत आळवला गेला अन् पाकिस्तानमध्येही एकच खळबळ उडाली. या बैठकीत आणि एकूणच चर्चांमध्ये थेट ‘पाकिस्तानी लष्कर’ असा शब्दप्रयोग न करता, सर्वच नेत्यांनी सावधपणे मात्र ‘एस्टॅबलिशमेंटचा हात’ म्हणत इमरान खान, लष्कर आणि आयएसआयवरही तोंडसुख घेतले. यामध्ये आघाडीवर होते ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पीएमएल-एन’चे सर्वेसर्वा नवाझ शरीफ. लंडनमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी या बैठकीत हजेरी लावली. आपल्या जवळपास एक तासाच्या भाषणात शरीफ यांनी इमरान खान सरकार कसे परराष्ट्र धोरणापासून महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे वगैरेचा पाढा वाचला. दुसरीकडे ‘पीपीपी’ या भुट्टो-झरदारींच्या पक्षानेही सर्व पक्षीयांनी रस्त्यावर आणि संसदेतही या सरकारविरोधी आसूड ओढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. पण, या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी या पक्षांना लष्कराला यामध्ये न ओढण्याचे आवाहन करण्यात आल्याची बातमीही नंतर समोर आली. याचाच अर्थ, सरकार जरी अप्रत्यक्षपणे लष्करी तालावर नाचत असले तरी चेहरा हा शेवटी इमरान खानचा. त्यामुळे पाकिस्तानच्या सद्यस्थितीला जबाबदारही खान आणि त्यांचे मंत्रिमंडळच, हे लष्करही जाणून आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचा, त्यांच्या आंदोलनातून जनतेचा रोष यदाकदाचित उसळून आलाच, तर देशांतर्गत परिस्थिती पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणाबाहेरही जाऊ शकते.

 
पण, खरंतर पाकिस्तानी जनतेलाही त्यांच्या देशातील सरकारचे खरे सूत्रधार कोण आहेत, याची कल्पना आहेच. त्यातही पाकिस्तानात भ्रष्टाचारी राजकारण्यांऐवजी जास्त विश्वास हा लष्करावरच असल्याचे दिसते. मग कराचीमधील पूरस्थिती असेल अथवा कोरोना काळातील मदत, पाकिस्तानी सरकारी यंत्रणेपेक्षा लष्करच जनतेच्या मदतीला धावून आल्याने सरकारविरोधी तीव्र नाराजी आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी इमरान खान आणि लष्कराविरोधात जनआंदोलन छेडले, तरी त्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त जनमानसाचा किती पाठिंबा मिळेल, याची शाश्वती नाहीच. पण, विरोधी पक्षांचे हौसले बुलंद केले ते असीम बाजवा या भ्रष्ट जर्नलवर झालेल्या आरोपांनी. त्यामुळे दबक्या आवाजातील विरोधी पक्षांना आणि माध्यमांनाही लष्कराविरोधात आयते कोलित सापडले आणि ती संधी न दवडता लष्करनियंत्रित इमरान खानच्या कठपुतळी सरकारवर सगळे एकत्रित तुटून पडले.
 
या घडामोडींमुळे जागतिक पातळीवरही पाकिस्तानच्या नामधारी लोकशाहीचा बुरखा फाटला असून भारताची बाजू अधिक भक्कम झाली, असे म्हणता येईल. कारण, भारताने पाकिस्तानातील आजवरच्या सरकारांशी जेव्हा जेव्हा संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले, त्या त्या वेळी पाकिस्तानी लष्कराने त्यात खोडा घालत आपल्याच सरकारला तोंडावर पाडून युद्धछायेत ढकलेले. पण, आता पाकिस्तानी लष्कराचा हा खेळ चव्हाट्यावर आला आहे. ‘स्टेट विदीन स्टेट’ या उक्तीनुसार पाकिस्तानचे खरे राज्यकर्ते हे लोकनियुक्त सरकार नसून लष्कराच्या पसंतीचे सरकार आहे, यावरच शिक्कामोर्तब झाले. यामुळे आधीच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पिचलेल्या पाकिस्तानच्या अडचणींत कैकपटींनी भर पडली असून, या देशाची अधिक गहिर्‍या संकटाकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे एकीकडे भ्रष्ट विश्वास गमावलेले विरोधी पक्ष, दुसरीकडे निकम्मा पंतप्रधान आणि तिसरीकडे गळा कापणारे लष्कर, अशा तिहेरी संकटात पाकिस्तानी जनता भरडली गेली असून, त्याचे आगामी काळात काय परिणाम होतील, ते पाहावे लागेल.

 
@@AUTHORINFO_V1@@