मराठी मालिकेच्या सेटवर कोरोनाचा प्रसार ; ‘या’ अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

21 Sep 2020 16:40:08

Marathi Serial_1 &nb
 
 
सातारा : एकीकडे राज्यात अनलॉक सुरु होत असताना ग्रामीण भागाकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामध्ये आता हळूहळू सिनेमा आणि मालिकांचे शुटींगदेखील सुरु करण्यात आले आहे. नुकतेच ‘माझी आई काळूबाई’ या मालिकेतील कलाकारांसह काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता मराठी मालिका तसेच चित्रपटांच्या निर्मात्यांची चिंता वाढणार आहे. दरम्यान, हा कोरोनाचा प्रादुर्भाव मालिकेच्या एका गाण्याच्या चित्रकारांसाठी आलेल्या एका ग्रुपमधून झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 
साताऱ्यातील फलटण तालुक्यामध्ये या मालिकेचे चित्रीकरण चालू होते. काही दिवसांपूर्वी या मालिकेतल्या एका गाण्याचे चित्रीकरण सुरु होते. याचदरम्यान एक्स्ट्राजपैकी काहीजणांना करोनाची बाधा झाली. यामुळे मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही करोनाची बाधा झाली. १६ सप्टेंबरला त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती समोर आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0