भिवंडी दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू : पंतप्रधानांकडून शोक

21 Sep 2020 13:33:33
Thane Bhiwandi_1 &nb
 
 
ठाणे : भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १० वर पोहोचला आहे. अजूनही दुर्घटनास्थळी अडकलेल्या २०-२५ जणांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांनी एकूण १९ लोकांना बाहेर काढले. एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरू आहे. एका लहान मुलालाही वाचवण्यात यश आले आहे.
 
 
 
रविवारी मध्यरात्री ३.४० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. इमारतीतील सर्वजण गाढ झोपेत असताना अचानक इमारत कोसळली. जीर्णावस्थेतील ही तीन मजली इमारत कमकुवत झाली असून धोकादायक अवस्थेत होती. एकूण २१ कुटूंबे यात राहत होती. एनडीआरएफच्या पथकाने एका लहान मुलाला सुरक्षित बाहेर काढले. प्रार्थमिक माहितीच्या आधारे ही इमारत १९८४ साली बनली असावी, असा दावा केला जात आहे.
 
 

Thane Bhiwandi_1 &nb 
 
 
 
राज्य सरकारचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी प्रतिक्रीया दिली आहे. अवैध बांधकामावर कारवाई व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. १९८६ मध्ये या इमारतीची निर्मिती झाली. इमारतीला खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र कायदेशीर प्रक्रियेमुळे ही रिकामी होऊ शकलेली नाही. या संदर्भात एक बैठक घेण्यात आली होती, असेही आव्हाड म्हणाले. पालिका अधिकारी व पोलीस एकत्र येऊन ही कामगिरी पूर्ण करत नाही तोपर्यंत ही कारवाई शक्य नाही, असेही ते म्हणाले.
 
 
राष्ट्रपती व पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. मोदी म्हणतात, "पीडितांप्रती आणि त्यांच्या कुटूंबियांसह माझ्या संवेदना आहेत. जखमींवर लवकर उपचार होऊन बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरू आहे. शक्य तितक्या लवकर अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील."
 
 
मृतांची नावे
 
1). जुबेर कुरेशी (३० वर्षे)
2). फैजा कुरैशी (५ वर्षे)
3). आयशा कुरैशी (७ वर्षे)
4). बब्बू (२७ वर्षे)
5). फातिमा जुबैर बाबू (२ वर्षे)
6). फातिमा जुबैर कुरैशी (८ वर्षे)
7). उजेब जुबैर (६ वर्षे)
8). अस्का आबिद अंसारी (१४ वर्षे)
9). अंसारी दानिश अलिद (१२ वर्षे)
10). सिराज अहमद शेख (२८ वर्षे)
Powered By Sangraha 9.0