नवी दिल्ली : राज्यसभेत रविवारी केंद्र सरकारने शेतीशी निगडीत दोन कृषि विधेयके फार्मर्स अॅण्ड प्रोड्यूस ट्रेड अॅण्ड कॉमर्स (प्रमोशन एंड फैसिलिटेशन) बिल आणि फार्मर्स (एम्पावरमेंट अॅण्ड प्रोटेक्शन) अग्रीमेंट ऑन प्राइस अश्योरेंस अॅण्ड फार्म सर्विस बिल आवाजी मतदानाने पारीत केले. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे कायदे लागू केले जातील.
यापूर्वी मतदानावेळी सदनात गोंधळ सुरू होता. विरोधी पक्षातील खासदारांनी वेलमध्ये येत घोषणाबाजी केली. तृणमुल खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपसभापती हरिवंश यांचा माईक तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सदनाची नियमावली पुस्तिका फाडून टाकली. सदनाची कार्यवाही सुरू ठेवण्यासाठी मार्शलांना पाचारण करण्यात आली आहे. दहा मिनिटांसाठी कार्यवाही स्थगित केल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रीया सुरू झाले. विरोधी पक्षांच्या गोंधळातच सरकारला बिल पारीत करावे लागले.
कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना दिला विश्वास
कृषी मंत्री यांनी विधेयक पटलावर ठेवले. दोन्ही विधेयके ऐतिहासिक आहेत. या द्वारे शेतकऱ्यांना आपले उत्पादन हव्या त्या ठिकाणी विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकऱ्यांना देशभर आपले उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
वायएसआरसीपी खासदार म्हणाले...
वायएसआरसीपी खासदार पी पी रेड्डी यांनी या बिलावरून काँग्रेसला धुतले. ते म्हणाले, "काँग्रेसकडे या बिलाचा विरोध करण्यासाठी कुठलेही कारण नाही. काँग्रेस मध्यस्ती आणि दलालांच्या सोबत उभी आहे. काँग्रेस वचननामा दाखवत शेतकऱ्यांशी कशाप्रकारे धोका करत असल्याचा उल्लेख केला. काँग्रेसने जे वचन शेतकऱ्यांना दिले होते. त्यांची पूर्तता या बिलातून केली जात आहे." रेड्डींच्या या वक्तव्यानंतर खासदार आनंद शर्मा यांनी गोंधळ घातला व रेड्डींना माफी मागण्यास सांगितले.
केजरीवाल-काँग्रेसचा विरोधाचा सूर
आम आदमी पक्षातर्फे शेतकऱ्यांशी निगडीत सर्व बिलांचा विरोध केला आहे. राहुल गांधींनीही या बिलाचा विरोध केला. केजरीवाल यांनी ट्विट करत सर्व विरोधी पक्षांनी यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.