शहरातील बेरोजगारांसाठी मोदी सरकारची योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2020
Total Views |

MANREGA_1  H x
 
 


मुंबई : रोजगार योजना मनरेगा आता शहरांतही लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहेत. गावाप्रमाणे आता शहरांतील व्यक्ती याचा लाभ घेतील, अशी योजना आखली जात आहे. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजूरांवर ओढावेले संकट पाहता त्यांना रोजगार देणे क्रमप्राप्त आहे. ही योजना सफल झाल्यास शहरातील मोठी लोकसंख्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 
 
याबद्दलची प्रार्थमिक माहिती अशी की, सुरुवातीच्या टप्प्यात रोजगार कार्यक्रम लहान शहरांमध्ये अंमलात आणला जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये प्रशिक्षित आणि कुशल कामगारांची गरज असते. तर लहान शहरांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीला जास्त प्रशिक्षणाची गरज नसते. या योजनेअंतर्गत ३५०० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. कोरोनाच्या संकटात संधी म्हणून या योजनेचा कसा वापर करून रोजगार निर्माण करता येतील, याचा विचार सरकार करत आहे.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मनरेगा अंतर्गत यापूर्वीच एक लाख कोटी खर्च केले आहेत. या योजनेत ग्रामीण भागात प्रतिव्यक्तीला किमान दोनशे रुपये देण्याची अट आहे. तर कमीत कमी शंभर दिवस या व्यक्तीला काम करणे गरजेचे आहे. या योजनेमुळे स्थलांतरीत मजूरांचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.
 
 
आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानल्या जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा झटका मानला जात आहे. जीडीपी वृद्धीत तिमाहीत २३.९ टक्के घट झाली आहे. मनरेगा अंतर्गत जास्त प्रशिक्षणाची गरज नसते. रस्ते निर्मिती, इमारतींचे बांधकाम, तलाव बांधणी, विहीर योजना आदी कामांमध्ये मनरेगाअंतर्गत कामे केली जातात.
 
 
 
आत्तापर्यंत देशभरातील २७ कोटी लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे बरेचसेजण हे आपापल्या गावी पायपीट करत निघून गेले आहेत. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना त्यांनी आपली जमापुंजीही गमावली आहे. या मोठ्या वर्गाला मदत करण्यासाठी सरकार ही योजना लागू करत आहेत.
 
 
कोरोनामुळे देशात शहरी भागात रोजगारावर परिणाम झाला आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांना त्याचा जास्तीत जास्त फटका बसला आहे. एप्रिलमध्ये १२.१ कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. बेरोजगारीचा दरही २३ टक्क्यांवर पोहोचला आहे. अनलॉकच्या प्रक्रीयेनंतर बेरोजगारीत घट झाल्याचेही आकडेवारी आहे.
 
 
 
अर्थव्यवस्थेला बळकटी येणार
 
विश्वेषकांच्या मते, शहरांमध्ये जर मनरेगा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगार मिळून त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी मोठी मदत होईल. अद्यापही कोरोनामुळे देशातील संपूर्ण अर्थचक्रे सुरळीत सुरू झालेली नाहीत. गावाकडे परतलेले आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळेल, अशीही अपेक्षा आहे.
@@AUTHORINFO_V1@@