रणबीर, रणवीर, विक्की कौशल तुम्ही ड्रग्ज चाचणी करा !

    दिनांक  02-Sep-2020 14:09:01
|

Kangna_1  H x W
 
 
 
 
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळावा म्हणून कंगनाने बॉलीवुडविरोधात खुलेपणे आपली भूमीका मांडण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही कंगना सतत अॅक्टीव्ह दिसून येते आणि सुशांतच्या मृत्यूबद्दल सातत्याने पाठपुरावा करणारे ट्विट करत असते. अशातच कंगनाने एक खळबळजनक आरोप केला आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी आदित्य चोप्रा, करन जोहर, महेश भट्ट आदींवर मुव्ही माफिया असल्याचा आरोप केला आहे.
 
 
 
 
कंगनाने पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत एक महत्वाची मागणी केली आहे. रणबीर सिंह, विक्की कौशल, रणबीर कपूर आणि आयान मुखर्जी यांनी ड्रग टेस्टसाठी रक्ताचे नमुने द्यावेत, असे आवाहन तिने केले आहे. कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हणते, "मी रणबीर सिंह, रणबीर कपूर, आयान मुखर्जी आणि विक्की कौशल यांना विनंती करते. "तुम्ही सगळे कोकेनचे व्यसनी आहात, अशा अफवा पसरल्या आहेत. तुम्ही स्वतःच्या रक्ताचे नमुने देऊन या अफवांचे खंडण करावे, अशी मागणी मी करत आहे.
 
 
 
 
कंगनाने हे ट्विट पंतप्रधान कार्यालयालाच टॅग केल्याने यातून आता नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. बॉलीवुडमध्ये ९९ टक्के लोक ड्रग्ज घेतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. पोलीसही या गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. बॉलीवुड पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री केली जाते, असा आरोपही तिने केला होता.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.