राज्यातील शालेय प्रवेशाचे वय शिथिल

19 Sep 2020 10:41:06

school_1  H x W



मुंबई :
राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता तीन वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर सहा वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे. २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून हा नियम लागू होणार असल्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला.



शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चिती करण्याबाबत काल शासन निर्णय जाहीर झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळाप्रवेशाबाबत शिथिलता देण्यात आली आहे. यामध्ये ३१ डिसेंबर मानिव दिनांक गृहीत धरून या दरम्यान विद्यार्थ्याचे वय पहिली वर्गाच्या प्रवेशासाठी किमान ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे तर व प्ले ग्रुप / नर्सरीसाठी प्रवेश घेण्यासाठी किमान ३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रवेश घेताना ३१ डिसेंबरपर्यत विद्यार्थ्याचे वय पहिलीसाठी ६ वर्ष पूर्ण व नर्सरी / प्ले ग्रुप साठी ३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे.मात्र, राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, आयबी मंडळाच्या शाळांमध्ये काही वेळा नियमांचे उल्लंघन होत होते.
Powered By Sangraha 9.0