राष्ट्रवादीच्या आमदारावर अदखलपात्र गुन्हा

    दिनांक  19-Sep-2020 17:15:14
|

NCP_1  H x W: 0शिर्डी :
राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. राजूर पोलीस ठाण्यात झाला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर  ग्रामपंचायत शिपायाला मारहाण केल्याचा आरोप होता. गाडी हळू चालवा सांगितल्याचा राग आल्याने मारहाण केल्याचा शिपाई रामदास बांडे यांचा आरोप होता. यासंबंधी रामदास लखा बांडे (वय ४०, रा. खडकी, ता. अकोले) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, खडकी गावातून आपण पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने एक गाडी आली. आम्हाला कट मारून ती पुढे गेली. कोणी तरी पर्यटक असावेत म्हणून आम्ही जोरात ओरडून गाडी हळू चालवा असे म्हणालो. त्यावर काही अंतरावर जाऊन ती गाडी थांबली. त्यातून आमदार लहामटे उतरले व म्हणाले, मला ओळखले का मी कोण आहे. असे म्हणून माझ्या पोटात त्यांनी लाथ मारली व शिवीगाळ करून ते निघून गेले.रामदास बांडे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार लहामटे यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.