इस्माईल यूसुफ महाविद्यालयात महिला कर्मचारीचे लैंगिक शोषण

    दिनांक  19-Sep-2020 20:40:03
|

Ismail Yusuf Clg_1 &
 
मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ७१ वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी विद्यार्थी संघटना आहे. काही दिवसांपूर्वी इस्माईल यूसुफ महाविद्यालयातील महिला कर्मचारीवर लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार अभाविपच्या निदर्शनास आली. शोषित महिला आपल्या महाविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहे. शोषित महिलेने वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही. अशा अतिसंवेदनशील बाबतीत महाविद्यालय प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने अभाविपच्या शिष्टमंडळाने त्वरित महाविद्यालयाच्या प्राचाऱ्यांची भेट घेतली.
 
 
“जर महाविद्यालयातील कर्मचारी महिलेलवर अन्याय होत असूनसुद्धा महाविद्यालय प्रशासन कारवाई करत नसेल, तर पुढे जाऊन महाविद्यालयातील विद्यार्थिनींना पण अशा लोकांपासून धोका होऊ शकतो. महाविद्यालय प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करत शोषित कर्मचारी महिलेला न्याय मिळून द्यावा. या अतिसंवेदनशील विषयात जर योग्य गतीने कारवाई झाली नाही तर न्याय मिळवून देण्याकरिता विद्यार्थी परिषदेला घटित प्रकाराबद्दल आंदोलन करावे लागेल.” असे मत मुंबई महानगर सहमंत्री विठ्ठल परब यांनी व्यक्त केले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.