सावधान! 'इन्स्टा', 'फेसबुक'तर्फे कॅमेऱ्यातून होतेय डेटा चोरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020
Total Views |
Facebook_1  H x




कॅलिफोर्निया :
फेसबूक-इन्स्टाग्रामच्या सर्वर डाऊनमुळे गुरुवारी मध्यरात्री जगभरातील युझर्सने आवाज उठवला होता. त्यातच आता फेसबूक आणि इन्स्टा या दोन्ही अॅप्समध्ये कथित हेरगीरी झाली असल्याचा आरोप केला जात आहे. फेसबूक कॅमेऱ्याचा वापर करून ही माहिती चोरी करत असल्याचा नवा आरोप लावला जात आहे.
  
 
या संदर्भातील खटल्यानुसार, आयफोन युझर्स जेव्हा फोटो शेअरींग अॅप इन्स्टाग्राम बंद असतानाही कॅमेऱ्याचा वापर होत असलेले आढळून आले. फेसबूकने हे आरोप फेटाळून लावले. कंपनीच्या मते, हे एका बग मुळे झाले असल्याचे सांगण्यात येत होते.
 
 सॅन फ्रान्सिस्कोच्या फेडरल कोर्टात गुरुवारी या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. इंस्टाग्राम यूजर ब्रिटनी कॉन्डिटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅमेरा जाणूनबुजून वापरला जात होता, असा आरोप त्यांनी केला होता. याचा वापर डेटा मायनिंगसाठी युझर्सचा महत्वपूर्ण डेटा जमा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
 
 
हे प्रकरण कॉन्डिटी विरुद्ध इन्स्टाग्राम, एलसीसी 20-cv-06534 येथे सुरू आहे. अमेरिकेतील जिल्हा न्यायालय उत्तर कॅलिफोर्निया येथे सुरू आहे. तक्रारीनुसार, युझरच्या घरातील वैयक्तीक माहिती चोरी करण्याच्या हेतूने हा प्रकार केला जात होता. फेसबूक असे करण्यात सक्षम आहे. दरम्यान कंपनीने या आरोपांबद्दल कुठलेही उत्तर दिलेले नाही. न्यायलयात मात्र, हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
 
कंपनी कशाप्रकारे करते निगराणी
 
जेव्हा ग्राहक मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारचे अॅप इन्स्टॉल करतात त्यावेळी बऱ्याच गोष्टींची परवानगी मागितली जाते. ज्यात संपर्क क्रमांक, मीडिया, लोकेशन, कॅमेरा आदी बाबींचा सामावेश असतो. आपण प्रत्येक गोष्टीला संमती दिल्यानंतर अॅप्स हा डेटा गोळा करू लागतात. याद्वारे बऱ्याचदा डेटा मायनिंग केले जाते, असा आरोपही आत्तापर्यंत बड्या कंपन्यांवर लावण्यात आला आहे. फेसबूक, इन्स्टाग्राम या अॅप्सना आपण पूर्वीपासूनच अधिकार दिलेले असतात. त्यावेळी आपल्या मर्जीविना फोन कॅमेराही हाताळू शकतात.
 
 
डेटाचोरीपासून वाचण्यासाठी काय कराल ?
 
१. स्मार्टफोन्समधून डेटाचोरी रोखण्यासाठी त्याच अॅप्सना त्याच गोष्टीची परवानगी द्या ज्याची त्यांना गरज आहे. इन्स्टाग्रामला कॅमेरा आणि गॅलरीची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, संपर्क क्रमांक आणि लोकेशन यांची परवानगी देण्याची गरज नाही.
 
२. अॅप्सचा वापर करताना काम झाल्यावर पूर्णपणे बंद करणे. बऱ्याचदा आपण स्क्रीन मिनिमाईज करून अॅप्स मागे सुरूच ठेवतो. अशावेळी अॅप्स तुमच्या डेटावर नजर ठेवून असतात. त्यामुळे गरज नसताना असे अॅप्स पूर्णपणे बंद करावेत.
 
 
३. डेटा बंद म्हणजे फोन सुरक्षित. तुम्ही जेव्हा मोबाईल इंटरनेटचा वापर करत नाही त्यावेळी मोबाईल डेटा बंद करून ठेवावा. डेटा बंद ठेवाल त्यावेळेस डेटा चोरीची शक्यता पूर्णपणे नाहीशी होऊन जाते.
 
यापूर्वीही फेसबूकवर लागले आहेत आरोप
 
बायोमेट्रिक डेटा कलेक्शनचा आरोप : फेसबूकवर ऑगस्टमध्ये अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला आहे. फेसबुकची कंपनी इन्स्टाग्रामद्वारे त्यांच्या युझर्सचा बायोमेट्रीक डेटा कलेक्शनचा आरोप लावण्यात आला होता. इन्स्टाग्रामतर्फे युझर्सचा चेहरा आपोआप स्कॅन केला जातो, हा आरोप लावण्यात आला होता. या काळात १० कोटी लोकांचा डेटा गोळा करण्यात आल्याचा आरोप इन्स्टाग्रामवर लावण्यात आला होता.
 
पेगासस स्पाईवेयर खरेदीचा आरोप: काही महिन्यांपूर्वी एनएसओ ग्रुपवर व्हॉट्सअॅप स्पाय करण्यासाठी Pegasus (पेगासस) स्पाईवेयर खरेदी करण्याचा फेसबूकच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केल्याचाही आरोप झाला होता.
 
 
८.७ कोटी युझर्सचा डेटा चोरी : युझर्सचा डेटा सुरक्षित न राहिल्यामुळे फेसबूकवर ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. २०१६ मध्ये युरोपीयन युनियनतर्फे फेसबूकने युझर्सच्या डेटाचा दोन्ही बाजूने दुरुपयोग केल्याचे म्हटले होते. फेसबुकतर्फे ब्रिटीश कन्सल्टंट कंपनी केंब्रिज एनालिटिकातर्फे ८.७ कोटी युझर्सचा डेटा चोरी झाल्याची माहिती दिली होती. याच कंपनीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी निवडणूक प्रचार अभियान चालवले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@